काराकास : अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किना-याजवळ समुद्राच्या मध्यभागी एका खूप मोठ्या क्रूड ऑइल टँकरला जप्त केले. बुधवारी अमेरिकेचे अॅर्नी जनरल पॅम बॉन्डी यांनी सोशल मीडियावर या ऑपरेशनचा ४५ सेकंदांचा व्हीडीओ जारी केला.
व्हीडीओमध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टर समुद्रावरून वेगाने उडत एका टँकरला वेढतात. त्यांच्यातून अनेक कमांडो दोरीच्या साहाय्याने टँकरच्या डेकवर उतरतात आणि काही मिनिटांतच टँकरला आपल्या ताब्यात घेतात. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या जप्तीची पुष्टी केली. दुसरीकडे, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी या कारवाईला सागरी दरोडा आणि उघड चोरी ठरवत तीव्र निषेध केला आहे.
ट्रम्प म्हणाले आम्ही व्हेनेझुएलाच्या किना-यावर एक टँकर जप्त केला आहे, खूप मोठा टँकर, कदाचित आतापर्यंतचा सर्वात मोठा टँकर. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जहाजात भरलेल्या लाखो बॅरल तेलाचे काय होईल, तेव्हा ट्रम्प हसत म्हणाले, आम्ही ते ठेवू, असे मला वाटते.
बेकायदेशीरपणे व्हेनेझुएलाचे तेल घेऊन जात होता
अटॉर्नी जनरल बॉन्डी म्हणाले की, हे जहाज अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीत होते कारण ते व्हेनेझुएला आणि इराणचे प्रतिबंधित तेल बेकायदेशीरपणे घेऊन जात होते. या तेलाच्या कमाईतून परदेशी दहशतवादी संघटनांना मदत केली जात होती.

