20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईल ‘मिनटमॅन ३’ची चाचणी

अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईल ‘मिनटमॅन ३’ची चाचणी

कॅलिफोर्निया : अमेरिकी हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने कॅलिफोर्नियातून एका निशस्त्र मिनटमॅन ३ बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केली. ही नियमित चाचणी होती. ही मिसाईल मार्शल द्वीप समुहाजवळील रोनाल्ड रीगन बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स टेस्ट ठिकाणावर उतरली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र शस्त्रांच्या चाचण्या करण्याबद्दल विधान केल्यानंतर पहिल्यांदाच ही चाचणी करण्यात आली आहे.

अमेरिकेची मिनटमॅन ३ ही सर्वात जुनी आयसीबीएम मिसाईल आहे. ही १९७० पासून वापरली जात आहे. ही मिसाईल जमिनीवर लॉन्च करता येते आणि १३,००० किलोमीटर इतका लांबपर्यंत मारा करू शकते. या मिसाईमध्ये आण्विक शस्त्र लावले जाऊ शकतात. चाचणी करताना मात्र मिसालईमध्ये अण्वस्त्र लोड केले गेले नव्हते.

अमेरिकेजवळ अशा ४०० मिसाईल असून, रशिया आणि चीन सारख्या देशापासून संरक्षण करण्यासाठी ठेवल्या गेल्या आहेत. मिनटमॅन ३ हे नाव मिसाईलला यामुळे दिले गेले आहे, कारण ही मिसाईल डागण्यासाठी १ मिनिटातच तयार होते. २०३० पर्यंत या मिसाईलला अत्याधुनिक करण्यासाठी आता अमेरिका काम करत आहे. अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड म्हणालेले की, रशिया, चीन आणि पाकिस्तान हे देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिका मागे राहू शकत नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी लागलीच पेटागॉनला चाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR