23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाअमेरिका ११५ धावांत गारद; ख्रिस जॉर्डनचीे हॅटट्रिक

अमेरिका ११५ धावांत गारद; ख्रिस जॉर्डनचीे हॅटट्रिक

किंग्सस्टोन ओहल : इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेला स्वस्तात रोखले. आदिल राशिदने फिरकीचा चांगला मारा केला. ग्रुप २ मध्ये इंग्लंड व वेस्ट इंडिज प्रत्येकी २ गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. दक्षिण आफ्रिका ४ गुणांसह आघाडीवर असली तरी त्यांचे उपांत्य फेरीचे स्थान निश्चित नाही. त्यामुळे आजच्या निकालावर पुढील बरेच गणित अवलंबून आहे. इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डनने हॅटट्रिक घेतली. ख्रिस जॉर्डनने १९व्या षटकात हॅटट्रिक घेताना अमेरिकेचा संपूर्ण संघ ११५ धावांत तंबूत पाठवला. जॉर्डनने २.५-०-१०-४ अशी स्पेल टाकली. सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. अमेरिकेने ६ चेंडूंत ५ विकेट्स गमावल्या.

गतविजेत्या इंग्लंडने सुपर ८ मध्ये अखेरच्या क्षणाला एन्ट्री घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळेल असे वाटले होते. पण, सुपर ८ च्या दुस-या लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना हार पत्करावी लागली आणि उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळवण्याची त्यांची संधी इतरांवर अवलंबून राहिली. इंग्लंडसमोर आज अमेरिकेचे आव्हान आहे आणि हा सामना ंिजकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण, त्यांना विजयासोबतच नेट रन रेटही प्रचंड सुधरावा लागणार आहे. ग्रुप २ मध्ये सध्या दक्षिण आफ्रिका ४ गुण व ०.६२५ नेट रन रेटसह अव्वल क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज ( १.८१४) आणि इंग्लंड ( ०.४१२) हे प्रत्येकी २ गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR