22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीय'वापरलेले कंडोम, खराब अंडरवियर अन्...', प्रवासी फ्लाईटमध्ये काय-काय विसरतात?

‘वापरलेले कंडोम, खराब अंडरवियर अन्…’, प्रवासी फ्लाईटमध्ये काय-काय विसरतात?

नवी दिल्ली : ट्रेन, बस किंवा टॅक्सी, रिक्षातून प्रवास करताना तुम्ही तुमच्या वस्तू तिथेच विसरलायत का? बऱ्याचदा विसरला असाल… आपल्यापैकी अनेकजण छत्री, मोबाईल, पाकिट किंवा सोबतच्या इतर अनेक वस्तू कुठे ना कुठे विसरले आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का? विमानातून प्रवास करताना प्रवास काय-काय विसरत असतील? विचारात पडलात ना? सोशल मीडियावर सध्या याचसंदर्भात एका फ्लाईट अटेंडेंटच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. या फ्लाईट अटेंडंटनं लोक विमानात काय-काय विसरून जातात, याबाबत सांगितलं आहे.

एका फ्लाईट अटेंडंटनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर (मला काहीही विचारा) सेशन घेतलं. रेडिटवर नावाच्या युजरनं कम्युनिटीमध्ये लिहिलं की, “मी एका मोठ्या अमेरिकन एअरलाईनमध्ये फ्लाईट अटेंडेंट आहे, मी 25 वर्षांपासून या अमेरिकन एअरलाईनमध्ये काम करतोय. मला काहीही विचारू शकता.”

एका यूजरनं प्रश्न विचारला की, तुम्ही फ्लाईटमध्ये आतापर्यंत सर्वात वाईट गोष्ट काय पाहिली आहे? युजरला फ्लाईट अटेंडन्टनं उत्तर देताना लिहिलंय की, “वापरलेले कंडोम, घाणेरड्या अंडरवेअर (पुरुष आणि महिला दोघांच्याही), वापरलेले टेम्पॉन यांसारख्या गोष्टी सापडल्यात. आता फक्त काहीच गोष्टी सांगितल्यात, यापेक्षाही भयानक गोष्टी सापडल्यात. आणखी एका युजरनं प्रश्न विचारला आहे की, “एखाद्या मद्यपीला पिण्यापासून रोखल्यावर किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू परत मिळवून दिल्यावर, तुम्हाला कधी अवॉर्ड मिळालाय? युजरला फ्लाईट अटेंडन्टनं उत्तर देताना लिहिलंय की, “हो, त्यांनी माझ्याशी भांडण केलंय, एक व्यक्ती तर माझ्यावर थुंकली देखील आहे.”

फ्लाईट अटेंडन्टनं हेदेखील सांगितलं की, त्यांनी लोकांना धुम्रपान करताना पाहिलं आहे. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी पोलिसांना विमान लँड होण्यापूर्वी सूचना दिली जाते. फ्लाईट अटेंडेंटनं नोकरी दरम्यान सामना कराव्या लागलेल्या आव्हानांबाबतही सांगितलं. ते म्हणाले की, “तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध असले पाहिजेत. आपण सुट्टीच्या दिवशी कार्यक्रमांना जाऊ शकत नाही. परंतु सर्वकाही कसे कार्य करते यावर अवलंबून आहे. कुटुंबात लहान मुलं असतील तर ती वेगळी बाब आहे. तसेच, लोकांना अनेक विचित्र प्रश्न विचारले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR