38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeसोलापूरव्ही. व्ही. पी अभियांत्रिकीमध्ये "ड्रोन डिझाईन" व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रोगामचे आयोजन

व्ही. व्ही. पी अभियांत्रिकीमध्ये “ड्रोन डिझाईन” व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रोगामचे आयोजन

सोलापूर : व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर व इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), सोलापूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी “ड्रोन डिझाईन टेक्नीक अ‍ॅन्ड देअर अ‍ॅनॅलिसिस” या विषयावर एक आठवडा कालावधीचा व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रोगामचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकमुनिकेशन विभागातर्फे करण्यात आले.

यावेळी तज्ञमार्गदर्शक सतीश भंडारी डिजिटल ऑटोमेशन, पुणे व प्रा. प्रविण मोहिते अ‍ॅपट्रॉन टेक्नॉलॉजी प्रा. लि., सातारा, प्रशिक्षक प्रतिक बारटक्के ॲपट्रॉन टेक्नॉलॉजी, सातारा, व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आय. ई आय. सोलापूर लोकल सेंटरचे सचिव डॉ. उमेश मुगळे, विभाग प्रमुख ए.यु. वागदरीकर, प्रा. प्रिती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहूणे सतीश भंडारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, आजचे तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस विकसनशील होत आहे व नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान उदयास येत अस्ल्याने ड्रोन तंत्रज्ञान हे यापैकीच आहे यामुळे अशा अद्ययावात तंत्रज्ञानाची सखोल माहिती भावी अभियंत्यांनी घेणे गरजेचे असल्याने या व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रोगामचा फायदा घ्यावा असे मौलिक मार्गदर्शन करून कृषी, वैद्यकीय, संरक्षण क्षेत्र, दळणवळण अशा क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी प्राथमिक माहिती दिली.

डॉ. उमेश मुगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानातील जागतिक घडामोडी व संशोधन यांची माहिती व्हावी यासाठी महाविद्यालय विविध विषयावर कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, प्रकल्पस्पर्धा यांचे आयोजन सातत्याने करीत असून याचा विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे मुल्यवर्धन करावे असे आवाहन केले. तसेच महाविद्यालय व आय ई. आय बद्दल माहिती देताना महाविद्यालयांना असे कार्यकम करण्यास नेहमीच सहकार्य असून विद्यार्थ्यांना अशा कार्य कमाास सहभागी होणेसाठी प्रोत्साहन दिले जाते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. अमिर वागदरीकर यांनी केले व ड्रोन तंत्रज्ञानाबाबत विद्यर्थ्यानी सखोल माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून घेवून आपल्या विविध शंकाचे निरसन करावे असे सुचित केले.कार्यकमाची सुरूवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. देशमुख व संस्थापक सचिव अमोल (नाना) चव्हाण, संस्था संचालक मधुकर कटकधोंड यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR