28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअवयवांच्या रेट कार्डवरून वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले

अवयवांच्या रेट कार्डवरून वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले

मुंबई : ‘आमदारांना खोके दिले जातात. पण सर्वसामान्य शेतक-यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. शेतक-यांनी आपल्या अवयवांचं रेटकार्ड पाठवलं तरी सरकारला गांभीर्य नाही.’ असे म्हणत विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, यंदा राज्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे बळिराजा चिंतेत आहे. आधीच कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबलेला असतानाच दुष्काळाचे संकट घोंघावते आहे. पाऊस कमी पडला. त्यामुळे पिके नीट वाढली नाहीत. आता रबी पिकांनाही पुरेसे पाणी नाही. अशात शेतकरी हवालदिल झाला आहे. या सगळ्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त बळिराजाने युती सरकारला अवयवांचे रेट कार्ड पाठवले असल्याचा उल्लेख केला आहे. याच मुद्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले आहे.

आमदारांना खोके दिले जातात. पण सर्वसामान्य शेतक-यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. शेतक-यांनी आपल्या अवयवांचे रेटकार्ड पाठवले तरी सरकारला गांभीर्य नाही. दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. शेतकरी चिंतेत असताना सरकारला त्याचे भान नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शेतक-यांना तातडीची मदत करण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR