25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeसोलापूरवैभव भोई,विनोद भोसले यांचा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार

वैभव भोई,विनोद भोसले यांचा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार

सोलापूर -अपघात समयी मदत करणाऱ्यांना मृत्यूजंय दूत पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सुरु केला असून गुरुवारी पोलिस अधिक्षकांच्या हस्ते वैभव भोई व विनोद भोसले या दोघांना हा पुरस्कार देण्यात आला.

मागील काही वर्षामध्ये शासनाकडून दळववळण सुलभहोण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते बांधणी सुरू आहे. यामुळे वाहनांना चांगल्या प्रकारचे रस्ते व सुविधा मिळत असल्याने प्रवासांचा वेळ कमी झाला आहे. तसेच रस्त्यावर अपघात देखील होत आहेत.

रस्ते अपघातामध्ये अपघात मिळाल्यानंतर जखमींना वेळीच मदत मिळाल्यास तसेच वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचा प्राण वाचू शकतात. अपघातामध्ये वेळीच व तात्काळ मदत करणाऱ्या व्यक्तींचे कौतूक करण्यासाठी पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी मृत्यूजंय दूत हा पुरस्कार सुरू केला आहे. त्याम ध्ये महिनाभरामध्ये जिल्ह्यातील अपघातामध्ये मदत करणारे नागरिकांचा प्रशंसापत्र देवून गौरव करण्यात येत आहे.

पोलिस मुख्यालयातील संवाद हॉलमध्ये आयोजित क्राईम बैठकीत बोलावून वैभव भोई व विनोद भोसले यांना प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. अपघाताम ध्ये मदत करणारे लोकांना पोलीस तपासाचा कोणताही त्रास होणार नाही याची हमी पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली.

३ फेब्रुवारी २०२५ रोजी विनोद भास्कर भोसले (रा. लवंग, ता. माळशिरस) हे त्यांच्या मोटार सायकलवरून टेंभूर्णीहून अकलूजकडे जात असताना जांभूळबेट पाटीजवळ एका इसमास अज्ञात वाहनाने धडक देवून गंभीर जखमी केले होते. तो इसम जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता. तेथे बऱ्याच बघ्यांची गर्दी जमली होती. परंतू कोणीही मदतीला धावले नाही. विनोद भोसले यांनी तेथील परिस्थीती पाहून अ‍ॅब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक १०८ वर फोन करून अ‍ॅब्युलन्स घटनास्थळावर बोलावून जखमीस उचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. तसेच त्याबाबतची माहिती पोलीसांना देखील दिली. त्यांच्या या कार्यास देखील मृत्यूजंय दूत पुरस्कार देण्यात आला.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोहोळ पोलीस ठाणेच्या हद्दीतून जाणाऱ्या कोळेगावजवळ सोलापूरहून पुण्याकडे जाणारे खाजगी प्रवाशी बसचा अपघात झाला होता. अपघातामध्ये बस पलटी होवून बसममध्ये असलेल्या प्रवाशांपैकी १५ प्रवाशी जखमी झाले होते. अपघातानंतर तेथे हजर असणारा वैभव दत्तात्रय भोई (रा. वडापूर, ता. दक्षीण सोलापूर) यांनी आपल्या पायात चप्पल नसताना देखील आपल्या जिवाची परवा न करता पायाने लाथा मारून बसच्या काचा फोडून बसमध्ये अडकलेल्या जखमी व इतर नागरिकांना रस्त्यावरून येणारे जाणारे वाहनांना विनंती करून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले होते. त्याच्या प्रशंसनिय व अतुलनिय कामासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दखल घेऊन मृत्यूजंय दूत पुरस्कार देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR