धारूर : तरनळी येथील अशोक मोहिते नावाच्या तरुणाला वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस म्हणून मारहाण करणा-या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्या कर्नाटकमधून मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
केज तालुक्यातील धारूर पोलिस स्टेशन हद्दीमधील तरनळी गावामध्ये वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस म्हणून अशोक मोहिते यास काल (ता.०५) लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड आणि कोयत्याने जबर मारहाण झाली होती. याप्रकरणी मावसभाऊ बालासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलिस स्टेशनमध्ये वैजनाथ बांगर, अभिषेक सानप या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. मात्र येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेत या दोन्ही आरोपींचा पाठलाग करत कर्नाटक येथून अटक केली.