22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यातील वकिल कोर्ट कामकाजासून अलिप्त

सोलापूर जिल्ह्यातील वकिल कोर्ट कामकाजासून अलिप्त

सोलापूर : पंढरपूर अधिवक्ता (वकिल) संघाचे सदस्य ॲड पंकज हातगिने यांचे वर पक्षकाराने फी देणेचे कारणावरून त्यांची गाडी अडवून त्यांचे वर हल्ला केला,धमकी देत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली . त्या संदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपी शामराव लाडे,.अक्षय कंडरे, मंगल लाडे …ईतर एक अशा चौघा विरोधात भा.द.वी कलम 327,427,504,506 व 34 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे . सदर घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी ठीक ११:०० वाजता सोलापूर सह पंढरपूर, मोहोळ ,माढा , अक्कलकोट आदी वकिल संघानी तातडीची सभा आयोजित करून वकिलावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून वकिल संरक्षण कायदा..तातडीने लागू करण्यासाठी उठाव केला .तसे ठराव सभेत संमत केले .. शिवाय मंगळवारी दि.१४/२/२४ रोजी दिवसभर कोर्ट कामकाजासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे दिवसभर कोर्ट कामकाज ठप्प राहिले. सोलापूर येथील सभेत झालेला निर्णय जिल्ह्यातील ईतर तालुका कोर्टाला. सोलापूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड यांनी कळविला .त्यांचे पालन सर्व ठिकाणी करण्यात आले. या तातडीच्या सभेत ॲड.मिलींद थोबडे, ॲड. एस.व्ही. उजळंबे, ॲड.रमेश कणबसकर, ॲड.अमित आळंगे, ॲड.राजेद्र फताटे, ॲड.खतिब वकिल, ॲड.प्रमोद शहा, ॲड.शरद पाटील, ॲड.मळसिध्द देशमुख आदींनी याविषयी भावना व्यक्त केल्या. या सभेला सिनियर व ज्युनिअर वकिलाची मोठी उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR