16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई

वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई

बीड : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज मोठे विधान केले. त्याचबरोबर अजित पवारांसोबत राजीनाम्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याच्या धनंजय मुंडेंच्या विधानावरही त्यांनी संताप व्यक्त केला. यात धनंजय मुंडेंचं वाटोळ होणार नाही, तर अजित पवारांचे होईल, असा इशारा सुरेश धस यांनी दिला.

एका मुलाखतीत बोलताना आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराड, धनंजयम मुंडेंबद्दल भाष्य केले. या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला होता. सुरेश धस म्हणाले, शंभर टक्के फाशी झाली पाहिजे. फाशीवर गेले पाहिजेत. यांचे जामीन नाही झाले पाहिजेत. यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. हे जर आका आत गेले, तर परळीतील राखेचे चटके बसणे लवकरच बंद होतील असे मला वाटते. आका आतच राहिले तर बरे होईल. नाहीतर हे काही दिवसात महाराष्ट्राचे लॉरेन्स बिष्णोई होईल. वाल्मीक अण्णा बिष्णोईचा भाऊ होऊ नये असे सुरेश धस म्हणाले.

पवारांनी मुंडेंना आणखी एखादे खाते द्यावे : धस
धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. किती वेळ कवटाळून शुभेच्छा देत होते, काय माहिती? अजित पवारांनी त्यांना मंत्री ठेवावे. आणखी एखादे मंत्रिपद द्यावे. त्यांच्याकडे वित्त व नियोजन आहे. नियोजन किंवा वित्त त्यांच्याकडे (धनंजय मुंडे) द्यावे. आमचे काही म्हणणे नाही.

स्वत:हून मंत्रि­पदाचा राजीनामा द्या
तुमची चर्चा कशावरही होऊद्या. तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? ट्रायल होईपर्यंत तुम्ही जा ना पदावरून बाजूला. कशाला पदावर राहता चिकटून? द्या राजीनामा स्वत:हून. अजित पवारांवर सांगण्याची वेळ कशाला येऊ देता, तुम्ही राजीनामा द्या ना. याचे काही वाटोळ होणार नाही, अजित पवारांचें होणार आहे. आम्हाला काय करायचे. अजित पवारांकडे जे लोक वळले आहेत, ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. नाहीतर नवीन नेता बघतील असे टीकास्त्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर डागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR