पुणे : बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहे.
शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्यानुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.