25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरसोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची माघार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची माघार

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज देखील पात्र ठरला होता, पण त्यांनी आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना पहायला मिळणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने देखील उमेदवार न देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तर अनेक अपक्षांनी आज (सोमवारी) निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. अजून अर्ज माघार घेण्यासाठी काही वेळ बाकी आहे. दरम्यान, वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

काही वेळाने ते आपली भूमिका माध्यमांसमोर जाहीर करतील, अशी शक्यता आहे. वंचित आणि महाविकास आघाडी व महायुती या तिन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी फाईट होईल, अशी शक्यता होती. पण, त्यांनी माघार घेतल्याने निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. वंचितची माघार कोणासाठी फायद्याची ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR