26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeराष्ट्रीयवंदे भारत ट्रेनचा घातपाताचा प्रयत्न

वंदे भारत ट्रेनचा घातपाताचा प्रयत्न

रेल्वे रुळावर टायबार फेसिंग रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न

आग्रा : भारतीय रेल्वेची सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतची लोकप्रियता चांगली वाढली असून जलदगतीने आरामदाय प्रवास होत असल्यामुळे वंदे भारतने प्रवास करणा-यांची संख्या वाढली आहे. परंतु या ट्रेनचा घातपात करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आहे. वंदे भारत ट्रेनवर अनेक ठिकाणी दगडफेक झाली आहे. आता गुरुवारी उदयपूर-आग्रा वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला. या ट्रेनच्या मार्गावर लोखंडाचा तुकडा पटरीवर (टायबार फेसिंग) ठेवण्यात आला होता. परंतु चालकाला ही बाब लक्षात येताच त्याने एमरजन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

उदयपूर-आग्रा वंदे भारत एक्सप्रेस (२०९८१) कोटा रेल मंडळाच्या बुंदी आणि तालेडा स्टेशन दरम्यान जात होती. त्यामुळे रेल्वे पटारीवर लोखंडाचा तुकडा ठेवण्यात आला. हा तुकडा टायबार फेसिंग असल्याचे अधिका-यांनी सांगितले. वंदे भारत रेल्वे पटरीवरुन घसरवण्याचा हा कट होता. रेल्वेच्या गार्डने तो लोखंडाचा तुकडा आपल्यासोबत नेला. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेच्या चौकशीचे आदेश
कोटा रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सौरभ जैन यांनी सांगितले की घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीनंतर हे सर्व प्रकरण स्पष्ट होणार आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडाचा तुकडा हा टायबार फेंसिंगचा आहे. तो रेल्वे स्टेशन किंवा कॉलनीजवळ फेसिंगसाठी वापरण्यात येतो. मग हा लोखंडाचा तुकडा त्या ठिकाणी कसा पोहचला? हा मोठा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी जवळपास स्टेशन नाही किंवा रेल्वे कॉलनीसुद्धा नाही. हा कोणी कट रचला आहे की चुकून केला गेला आहे. हे अजून स्पष्ट झाले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR