22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्यावंदेभारत मेट्रो मार्चमध्ये दाखल होणार!

वंदेभारत मेट्रो मार्चमध्ये दाखल होणार!

३०० किमीच्या अंतरासाठी भारतीय रेल्वेचा वेगवान पर्याय

नवी दिल्ली : आलिशान आणि वेगवान अशा भारताच्या पहिल्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला मिळालेल्या यशानंतर आता वंदे भारत मेट्रो येत्या मार्चमध्ये दाखल होणार आहे. वंदेभारत मेट्रो ट्रेन ही २५० ते ३०० किमीच्या छोट्या अंतरासाठी तयार करण्यात येत आहे. या वंदेभारत मेट्रो ट्रेन लवकरच ट्रॅकवर दाखल होणार आहेत. या ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असतील. तसेच त्यांच्या आत गॅँग वे असणार असून प्रवाशांना गाडीच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत एका डब्यातून शेवटच्या डब्यापर्यंत जाता येणार आहे.

वंदे भारत ही देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रवास दर ताशी १६० किमी वेगाने करता येतो. वंदेभारत ट्रेनला स्वतंत्र इंजिन जोडण्याची आवश्यकता नसते. तसेच ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असून स्वयंचलित दरवाजे असणारी आहे. सध्या देशात एकूण ३४ वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. या ट्रेनचा प्रवास आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक राज्यांनी वंदेभारत चालविण्याची मागणी केली आहे. यावर्षी ६० वंदेभारत सुरु होण्याची शक्यता आहे.

मुंबई-दिल्ली स्लिपर कोच

पहिली वंदेभारत ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालविण्यात आली होती. देशात सध्या एकूण ३४ वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. वंदेभारत चेअरकारची ट्रेन आहे. तिची स्लीपर कोच आवृत्ती लवकरच येणार आहे. ही स्लीपर कोच वंदेभारत राजधानीच्या मार्गावर दिल्ली ते मुंबई चालविण्याची शक्यता आहे.

वंदेभारतला मिळालेल्या यशानंतर मेन लाईनवर ईएमयूच्या जागी वंदेभारतची वंदेभारत मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. वंदेभारत मेट्रो मार्च महिन्यापर्यंत रुळावर येईल असे म्हटले जात आहे. वंदेभारत मेट्रोच्या प्रत्येक डब्यात १०० प्रवाशांना बसण्याची सोय असणार आहे. तर २०० प्रवाशी उभ्याने प्रवास करु शकणार आहेत.

वंदे भारत मेट्रोतील सेफ्टी फिचर्स

सिलबंद गॅँग वे, लाईटवेट डिझाईन, ऑटोमेटीक डोअर, एअरोडायनामिक डिझाईन, ड्रायव्हर केबिन एअरोडायनामिक डिझाईनची असणार, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वंदे भारत मेट्रोत सीसीटीव्ही कॅमेरे, एलसीडी डिस्प्लेसह पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, चांगला प्रकाश आणि रुट इंडीकेटरची सुविधा, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोमेटिक फायर डिटेक्शन आणि अलार्म यंत्रणा, पॅनोरॅमिक डिझाईनच्या खिडक्या असून त्यास रोलर ब्लाईंड असणार, आपत्कालिन संपर्कासाठी प्रत्येक डब्यात टॉक बॅक यंत्रणा, विमानतळाप्रमाणे व्हॉक्युम इव्हाक्युशेन सिस्टीमचे मॉड्युलर टॉयलेट असणार आहेत.ह्या्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी एल्युमिनियमचे लगेज रॅक असतील. ट्रेनची टक्कर टाळणारी ‘कवच’ नावाची टक्कर विरोधी यंत्रणा यात असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR