25.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून शुक्रवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवग्र तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांसाठीदेखील सन-२०२४-२५ पासून विदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ८२ शासकीय वसतीगृह स्थापन करण्यात मंजूरी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर उपलब्ध आहेत. सन २०३५ पर्यंत हे प्रमाण १०० हून अदिक करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढविने आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमदेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच, राज्याच्या ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रातून १५ ते ४५ वयोगटातील १८९८० उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवसी संशोधन प्रशिक्षण संस्था, बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था-सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था-महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी इत्यादी संस्था काम करत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी ५२ हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. अशी माहितीदेखील यावेळी अजित पवार यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता
वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अर्थिकदृष्टा दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत दरवर्षी ३७ के ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता देण्यात येत आहे. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीपाई फुले आधार योजनेअंर्गत दरवर्षी ३७ ते ६० रुपयांपर्यंत निवासभत्ता देण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR