24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरव्ही.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी महाविद्यालयात ‘आविष्कार-२०२४’ उत्साहात

व्ही.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी महाविद्यालयात ‘आविष्कार-२०२४’ उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स व्ही. डी. एफ. स्कुल ऑफ फार्मसी, लातूर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आविष्कार-२०२४ हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्या विद्यमाने आयोजीत करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे येथील व्ही. डी. एफ. स्कुल ऑफ इंजिनीअरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. मोहन बुके, गोल्डकिस्टहाय लातूर प्राचार्या डॉ. श्रीमती सुद, व्ही. डी. एफ. स्कुल ऑफ पॉलीटेक्नीक प्राचार्य साखर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी वाकुरे उपस्थित होते. शैक्षणिक संशोधन हा एक महत्वाचा घटक मानला जातो. त्याला अनुसरुन अविष्कार-२०२४ हा कार्यक्रम झाला. याचे मुख्य उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या लपलेल्या नाविन्यपुर्ण वैज्ञानिक कलागुणांची आणि क्षमतांची ओळख करुन देणे आणि त्यांना संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणे. तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी संशोधकामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे व संशोधन आणि संशोधकाचे कौतूक करणे तसेच फेलोशिपच्या स्वरुपात आर्थिक मदत देणे जेनेकरुन संशोधनाला चालना मिळते.

त्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध अभ्यासक्रमासहीत मानवता भाषा आणि ललीत कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रीकी आणि तंत्रज्ञान, औषध आणि औषधनिर्माणशास्त्र या श्रेणीमध्ये भाग घेतला. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे सादरीकरण केले. महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतून प्रत्येक श्रेणीमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेले १२ विद्यार्थी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले. या स्पर्धेसाठी परिक्षक प्रा. रनहेर एस. एस., प्रा. साळुंके एम. ए., प्रा. गादा एस. एन. यांनी काम पाहीले. महाविद्यालयीन स्तरावर निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देउन सन्मानित करण्यात आले व विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन प्रा. उन्नती खरे यांनी केले व कार्यक्रम समन्वक प्रा. उटीकर मोक्षदा, प्रा. जाधव स्नेहा यांच्यासह या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR