27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआवक घटली तरीही भाजीपाल्यांचे दर स्थिर

आवक घटली तरीही भाजीपाल्यांचे दर स्थिर

लातूर : प्रतिनिधी
भाज्यांचे दर स्थिर झाल्याने सामान्य नागरीकांना दिलासा मिळत आहे. ऑक्टोंबरच्या सेवटी घसरलेले जिल्ह्यातील पालेभाज्यांचे दर काहीसे स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात परतावा मिळू लागला आहे. शहरातील बाजारात आवक होणा-या पालेभाज्यांचा आधीच्या तुलनेत उठाव होऊ लागल्याने शेतक-यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शहरातील बाजारपेठेत पालक, गवारी, पत्तागोबी, मेथी, मिरची, कारले, शेपु, भेंडी, कोंथिबीर या पालेभाज्यांचे दर ऑक्टोंबर महीन्यात ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र हे दर आता स्थिरावले आहेत. त्यामुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार नाही. भाजीपाल्याला पाणीटंचाईची झळ बसल्याने भाजीपाल्याचा दर्जा घसरला असला तरी दर मात्र स्थिरावले आहेत. शहरातील महात्मा फुले मार्कट यार्डात भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर स्थिर दिसत आहेत. सध्या बाजारपेठेत येनारा सर्वत्र भाजीपाल्याची आवक चागल्या सोरूपात आहे. जिल्ह्यात गतवर्षापैक्षा यंदा पाउस कमी प्रमाणात झाल्याने शेतक-याने पालेभाज्यांची लागवडही कमी प्रमाणात केली आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे किरकोळ व होलसेल व्यापारी गुरूनाथ गोउबोले यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे.

त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात काकडी ३० ते ६० रुपये किलो, गवारी ८० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलो, कारले ४० रुपये किलो, पत्तागोबी २० ते २५ रुपये किलो, मिरची ६० ते ७० रुपये किलो, शेपु १५ रुपये पेंडी, वागें ५० रुपये किलो, शेवगा १०० ते १२० रुपये किलो, मेथी ३० रुपये पेंडी, कडिपत्ता ३० रुपये किलो, दोडका ५० रुपये किलो, शिमला मिरची ५० ते ६० रुपये किलो, लिंबू ६० रुपये किलो, अदरक १५० ते १६० रुपये किलो, कोथीबिर ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो ६०० ते ७०० रुपये कॅरेट, गाजर ५० रुपये किलो, फुलगोभी ४०ते ५० रुपये किलो, बटाटा ४० ते ६० रुपये किलो, कांदा पात २० रुपये पेंडी, काळे वागें ५० ते ६० रुपये किलो, वरणा ६० रुपये किलो, गावरान वागें ३० ते ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे बाजारात विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR