28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीय‘व्हर्टिकल’ खोदकामास वेग

‘व्हर्टिकल’ खोदकामास वेग

उत्तरकाशी : बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये राज्य, केंद्र सरकारच्या बचाव यंत्रणांसह आता दुर्घटनास्­थळी तुटलेले ऑगर मशीन काढण्­यासाठी लष्­कराला पाचारण करण्­यात आले आहे. दरम्यान, रविवार दि. २६ नोव्हेंबर व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे आता १ ते १.२ मीटर व्यासाचा उभा खड्डा खणण्यात येत आहे. पहिल्या दीड तासात १५ मीटर उभा खड्डा पाडण्यात आला असून अंदाजे ८६ मीटर खोल खोदावे लागेल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात ४१ कामगार गेल्या १५ दिवसांपासून अडकले आहेत. यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेत सुरूवातीला अमेरिकन ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने बोगद्यात खोदण्यात येत होते. मात्र बचावकार्यादरम्यान ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आदळले. त्यामुळे शुक्रवारी बचावकार्य स्थिगित करण्यात आले. त्यानंतर हे ऑगर मशीन तात्पुरते दुरूस्त करून पुन्हा बचाव कार्य राबवण्यात आले. बोगद्यात कोसळलेल्या ढिगा-यातून ड्रिलिंग करताना धातूच्या अडथळ्याचा सामना करावा लागल्याने ऑगर मशीन पुन्हा निष्क्रिय ठरले. यानंतर बोगद्यातील तुटलेले ऑगर ड्रिलिंग मशीन बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्काराला तैनात केले आहे. दरम्यान प्लाझ्मा कटरद्वारे अमेरिकन बस्टड ऑगर ड्रिलिंग मशीन काढण्याचे काम लष्कराच्या मदतीने सुरू आहे.

दोन दिवसांत ड्रिलिंग करणार
नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग संदर्भात माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही अशी ठिकाणे ओळखली जिथे ड्रिलिंग अधिक चांगले होऊ शकते. कामगाराच्या बचावासाठी आम्ेही २ ते ३ पर्यायांवर काम करायला सुरूवात केली आहे. यामधील एका पर्यायावर व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू झाले आहे. यामध्ये पहिल्या दीड तासात १ ते १.२ मीटर व्यासाचे १५ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले आहे. ही दीर्घकालीन प्रक्रीया असून अजून अंदाजे ८६ मीटर खोल ड्रिलिंग करावे लागेल. येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन २८ नोव्हेंबरपासून निश्चित व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू होईल, अशी आम्हाला आशा आहे असेही महमूद अहमद यांनी स्­पष्­ट केले आहे.

प्लाझ्मा मशीन सक्रिय
बोगदाकाम तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर रोजी बचावकार्यादरम्यान अमेरिकन-ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आदळले. हे मशीन बोगद्यातच अडकले असून त्याचे पार्ट अजूनही बाहेर काढण्यात येत आहेत. दरम्यान ऑगर मशीन कापून बाहेर काढण्यासाठी आता हैदराबाद येथून नवीन प्लाझ्मा मशीन मागवण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या मदतीने प्लाझ्मा मशीनद्वारे बिघाड झालेले ऑगर बाहेर काढले जात आहे. प्लाझ्मा मशीन हे जास्त वेगाने स्टील कापते, त्यामुळे ऑगर ड्रिंिलग मशीन कापण्यासाठी आता प्लाझ्मा मशीनचा वापर करण्यात येत असल्याचे टनेल तज्ज्ञ कूपर यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR