ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड;मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का

मुंबई : प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणा-या मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीच्या खास शैलीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटांमध्ये आई, सासू अशा विविध भूमिका साकारत त्यांनी मराठी मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, एका लावणीच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सहजसुंदर अभिनय, प्रभावी संवाद आणि लावणी सादर करण्याची खास शैली यामुळे त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘माझा छकुला’ आणि ‘एक होता विदूषक’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेकदा आई आणि सासूच्या भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच लावणीसाठी देखील त्यांचे योगदानही उल्लेखनीय होते. त्यामुळे त्या केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर एक कुशल लावणी कलाकार म्हणूनही ओळखल्या जात होत्या.

लावणीच्या कार्यक्रमादरम्यान आला पक्षाघाताचा झटका
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षांनंतर मधू कांबीकर या कार्यक्रमातून पुन्हा लावणी सादर करत होत्या. मात्र, कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जिद्दीने भैरवी सादर केली. पण, त्यानंतर त्यांना मेकअप रूममध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. या घटनेनंतर त्यांच्या उजव्या हातावर परिणाम झाला आणि त्यांच्या प्रकृतीच्या समस्या आणखी वाढल्या.

जीवनगौरव पुरस्काराने गौरव
२०१८ मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मधू कांबीकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांच्या सुनेने, शीतल जाधव यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या जाण्याने आज मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्यानंतर लावणीच्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news