22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रचित्रपट,राजकारणासह क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

चित्रपट,राजकारणासह क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पाचव्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून या मतदारसंघात एकूण ६९५ उमेदवारांच्या भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
तर महाराष्ट्रातील मतदानाचा हा शेवटचा टप्पा असून, आज १३ जागांवर मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सर्वच मतदारसंघा समावेश आहे. यामुळे आज मायानगरित राजकारणातील क्रिडा आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज चेहरे मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.

उल्लेखनीय आहे की, पाचव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, काँग्रेस नेते राहुल गांधी, लोजप (रामविलास) नेते चिराग पासवान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. अशा परिस्थितीत आज चित्रपट अनेक तारे तारका आपला मतदानाचा हक्क बजावत असून, जनतेला मतदान करण्याचे आवाहन देखील करत आहेत. दिग्गज चेहरे मतदानासाठी येत आहेत.

 

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील एका मतदान केंद्रावर मतदान केले आणि कृपया बाहेर या आणि मतदान करा. असे आवाहान मुंबईकरांना केले, तर अभिनेत्री सान्या मल्होत्रा, हेमा मालीनी अभिनेता अक्षय कुमार, नाना पाटेकर, राजकुमार राव यांच्यासह अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पीयूष गोयल यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे , आदित्य ठाकरे , वर्षा गायकवाड, राज ठाकरे यांच्यासह माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR