ढाका : बांगलादेशातील आंदोलकांनी १९७१ च्या युद्धाशी संबंधित राष्ट्रीय स्मारक पाडले. मुजीबनगरमध्ये असलेले हे स्मारक भारत-मुक्तीवाहिनी लष्कराच्या विजयाचे आणि पाकिस्तानी लष्कराच्या पराभवाचे प्रतीक होते.
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांनी हजारो सैनिकांसह भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांनी भारतीय लष्कराचे ऑफिसर कमांंिडग-इन-चीफ लेफ्टनंट-जनरल जगजित सिंग अरोरा यांच्यासमोर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यांची प्रतिमा या स्मारकात कोरलेली आहे. या स्मारकात पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कर आणि बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीला शरणागती पत्रावर स्वाक्षरी करताना दाखवले आहे.
मोहम्मद युनूस हा भारताला धोका नसल्याचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. युनूस यांचा पाकिस्तानच्या आयएसआय किंवा जमात-ए-इस्लामीशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. ते अमेरिकेच्या जवळ आहेत. अशा स्थितीत त्यांनी अंतरिम सरकार स्थापन केल्याने भारत-बांगलादेश संबंधांवर फारसा परिणाम होणार नाही. त्याचवेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हिंदू विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.
२०५ घटनांची नोंद
हिंदू विद्यार्थी अल्पसंख्याक हक्क आंदोलन गट युनूस सरकारपुढे ८ मागण्या मांडणार आहेत. ढाका ट्रिब्यूननुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर हिंदू समुदायावरील हल्ल्यांशी संबंधित २०५ घटनांची नोंद झाली आहे.