22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयबंगाल बंद दरम्यान हिंसाचार

बंगाल बंद दरम्यान हिंसाचार

भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार बॉम्ब फेक, दोन जखमी

कोलकाता : वृत्तसंस्था
भाजपने पश्चिम बंगालमधील सचिवालयावर काल महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांवर पोलिस केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज १२ तासांचा बंद पुकारला आहे.

या बंदला हिंसक वळण लागले असून, पक्षाचे नेते प्रियंगू पांडे यांनी दावा केला की पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील भाटपारा भागात टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केला आणि ६-७ राउंड गोळीबार केला. यासोबतच आपल्या गाडीवर बॉम्ब फेकल्याचा आरोपही त्यांनी केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.

या घटनेवर बोलताना भाजपचे माजी खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, प्रियंगू पांडे यांच्या हत्येचा कट होता. ते म्हणाले की, आमच्या पक्षाचे नेते येत असताना जेटिंग मशीन वापरून रस्ता अडवला गेला आणि बॉम्ब फेकले गेले. गोळीबाराच्या सात राउंड झाल्या आणि हा सर्व प्रकार एसीपींच्या उपस्थितीत झाला. प्रियंगू पांडेला मारण्याची योजना होती. १२ तासांच्या बंदमुळे बुधवारी पश्चिम बंगालमधील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान या निदर्शना दरम्यान शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांनी कोलकाता येथील बाटा चौकात आंदोलन करणा-या भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याआधी आज तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नबन्ना मोहीम मोर्चादरम्यान शांततापूर्ण निषेधांवर पोलिसांच्या कारवाईविरोधात भाजपने १२ तासांच्या बंगाल बंदच्या आवाहनाला विरोध केला. बंगालमध्ये अराजकता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR