24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयवीरेंद्र सिंग यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा; पद्मश्रीही परत करणार

वीरेंद्र सिंग यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा; पद्मश्रीही परत करणार

नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्यावर देशातील प्रमुख महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. तसेच नुकत्याच झालेल्या कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंग यांचा विशेष सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. यानिकालानंतर साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. तसेच कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्रीही पुरस्कार परत केला आहे. कुस्तीपटू वीरेंद्र सिंग यांनी या खेळाडूंना पाठिंबा दिला असून त्यांच्या समर्थानात पद्मश्री पुरस्कारही परत करणार असल्याचे सांगितले आहे.

कुस्तीपटू वीरेंद्र सिंग साक्षीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ते म्हणाले की, मी माझ्या बहिणीसाठी आणि देशाच्या मुलीसाठी पद्मश्री देखील परत करीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मला तुमच्या मुलीचा आणि माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे. पण मी देशातील आघाडीच्या खेळाडूंनाही आवाहन करेन. वीरेंद्र सिंह यांनी एक्सवरील या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करताना म्हटले आहे की, त्यांनी पण आपला निर्णय जाहीर करावा. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पंतप्रधान मोदींना पद्मश्री परत करण्यासाठी पत्र लिहिल्यानंतर वीरेंद्र सिंगची ही पोस्ट आली आहे.

पद्मश्री पदक ठेवले फूटपाथवर
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू शुक्रवारी संध्याकाळी मध्य दिल्लीतील कर्तव्य मार्गावर पोहोचला. तिथे त्याने पद्मश्री पदक एका फूटपाथवर ठेवले. त्यानंतर पोलिसांनी तो उचलला. बजरंग पुनिया याने शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जेव्हा महिला कुस्तीपटूंना योग्य सन्मान दिला जात नाही, तेव्हा मीही या सन्मानास पात्र नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR