24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयविष्णुदेव साय यांचा १३ डिसेंबरला शपथविधी

विष्णुदेव साय यांचा १३ डिसेंबरला शपथविधी

रायपूर : छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विष्णुदेव साय १३ डिसेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री साय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विष्णुदेव साईंच्या शपथविधी सोहळ्यात भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्रीही उपसत राहण्याची शक्यता आहे. रायपूर येथील सायन्स कॉलेजच्या मैदानावर दुपारी २ वाजता शपथविधी होणार आहे. छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी विष्णुदेव साय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली.

भाजपने सांगितले आहे की, पक्षाच्या राज्य मुख्यालयात ५४ नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीदरम्यान ५९ वर्षीय साय यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली. बैठकीनंतर, साय यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली. दरम्यान, साय यांनी सोमवारी सांगितले की, मुख्यमंत्री या नात्याने ते पंतप्रधान मोदींच्या “हमी” पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील आणि पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १८ लाख घरे मंजूर करण्याचा प्रयत्न करतील.

आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न
साय म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असेल. मुख्यमंत्री या नात्याने, मी पक्षाने निवडणूकपूर्व देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, ज्यांची हमी पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR