रायपूर : भाजप नेते विष्णुदेव साई यांनी बुधवारी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत विजय शर्मा आणि अरुण साओ यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छत्तीसगडमध्येही दोन जणांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ५४ जागा जिंकून सरकार स्थापन केले आहे.