28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeसोलापूरसोलापुरात विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाची निदर्शने

सोलापुरात विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाची निदर्शने

सोलापूर : औरंगजेबाची कबर उखडून टाका, अन्यथा आम्ही कारसेवा करून उखडून टाकणार, अशी घोषणा विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने केली. यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी औरंगजेबची कबर हटवण्याचा निर्धार करण्यात येत असल्याचे विहिंपने जाहीर केले.सरकारने विनाविलंब औरंगजेबाची कबर काढून टाकावी, यासाठी संपूर्ण राज्यभरात विहिंप बजरंग दलाच्यावतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तसेच विधानसभेत राज्य सरकारने ठराव करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कबर हटवावी. त्याची कबर येथे ठेवणे आणि त्याचे संरक्षण निषेधार्ह आहे. त्यामुळे सरकारने कबर हटवणे हाच एकमात्र उपाय आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर विहिंप बजरंग दलाने प्रतिज्ञा केली आहे. विहिंप जे संकल्प करते, ते पूर्णत्वास नेतो. त्यामुळे सरकारने याबाबत कार्यवाही केली नाही तर तिथे कारसेवा करण्याचा निश्‍चय आज करत आहोत असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले. तसेच जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांचीही भाषणे झाली. तसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देउन सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात विहिंपचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोेलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनाप्रसंगी जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी, गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, जिल्हा सहमंत्री बाबूजी गिरगल, विष्णू जगताप, पुरुषोत्तम उडता, जयदेव सुरवसे, अंबादास अक्कल, संजीव चिप्पा, बसवराज सोलापुरे, अक्षय कनकुंटला, अमितकुमार गडगी, शिवकुमार पसनूर, गोपाल म्हंता, आकाश सूर्यवंशी, दुर्गा वाहिनी संयोजक नंदीनी अक्कल, आदित्य चिप्पा, प्रज्वल बासुतकर, राजेंद्र सैनी आदी विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR