27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू

जकार्ता : पश्चिम इंडोनेशियातील सुमात्रा येथे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे.
मरण पावलेल्या ११ गिर्यारोहकांचे मृतदेह बचाव पथकांनी शोधून काढले आहेत. सोमवारी तीन जणांची सुटका करण्यात आली तर १२ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेंव्हा त्या भागात ७५ गिर्यारोहक उपस्थित होते. काही लोक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

त्या भागातून आतापर्यंत ४९ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. रविवारी मारापी या सक्रिय ज्वालामुखीतून उत्सर्जित झालेली राख हवेत तीन किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचली. माऊंट मारापी हा इंडोनेशियातील १२७ सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला असून लोकांना ज्वालामुखीच्या विवरापासून तीन किलोमीटरच्या आत न जाण्यास सांगितले आहे.

ज्वालामुखीतून निघणाऱ्या राखेच्या ढगांनी मोठा परिसर व्यापल्याचे व्हीडीओ फुटेजमध्ये दिसत होते. त्याच्या त्रिज्येत येणारी वाहने आणि रस्ते ज्वालामुखीतून निघणाऱ्या राखेने झाकलेले होते. शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख अब्दुल मलिक यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना तीन लोक जिवंत आणि ११ मृतदेह सापडले आहेत. शनिवारी घटनेच्या दिवशी एकूण ७५ गिर्यारोहक मेरापी पर्वतावर होते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पांढरी राख पसरली आहे. त्यामुळे गिर्यारोहक बेपत्ता असून आजूबाजूची गावे ज्वालामुखीच्या राखेने झाकली गेली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR