22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्र७ मे रोजी मतदान सर्व जण ७ द्या!

७ मे रोजी मतदान सर्व जण ७ द्या!

कोल्हापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तिस-या टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. हातणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक लढवणार असून आज निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली आहे.

राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर हातकणंगले मतदारसंघाच्या मतदान तारखेचा उल्लेख करत म्हटले आहे की ७ मे… सर्व जण ७ द्या, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला मतदारसंघातील नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. हातकणंगले मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे.

हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा पर्याय येऊ शकतो. स्वत: माने यांनाही त्यातच जास्त रस आहे; परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावरच चिन्ह बदलाचा निर्णय होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR