22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटक विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू

कर्नाटक विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू

६ जूनला होणार निकाल जाहीर

बंगळुरु : कर्नाटकातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या सहा जागांसाठी एकूण ७८ उमेदवार रिंगणात आहेत. तर ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. वास्तविक, पदवीधर एमएलसीचा कार्यकाळ संपल्यानंतर तीन जागा आणि शिक्षक एमएलसीच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत.

कर्नाटक विधान परिषदेच्या ७५ पैकी २९ जागा काँग्रेसकडे आहेत. ज्या सहा जागांवर मतदान होत आहे त्यामध्ये कर्नाटक ईशान्य पदवीधर, कर्नाटक दक्षिण पश्चिम पदवीधर, बंगलोर पदवीधर, कर्नाटक दक्षिण-पूर्व शिक्षक, कर्नाटक दक्षिण-पश्चिम शिक्षक आणि कर्नाटक दक्षिण शिक्षकांच्या जागांचा समावेश आहे.

पदवीधर मतदारसंघातून, डॉ चंद्रशेखर बी पाटील -कर्नाटक ईशान्य , अयानुरु मंजुनाथ -कर्नाटक दक्षिण-पश्चिम , ए देवेगौडा -बंगलोर यांचा कार्यकाळ संपला आहे. तर शिक्षक मतदारसंघातून, डॉ. वाय.ए. नारायणस्वामी -कर्नाटक दक्षिण-पूर्व , एसएल भोजे गौडा -कर्नाटक दक्षिण-पश्चिम आणि कर्नाटक दक्षिण-पश्चिम -मारिथिब्बा गौडा यांचा २१ जून रोजी कार्यकाळ संपत आहेत.

काँग्रेसने दक्षिण शिक्षक मतदारसंघातून मारिथिब्बा गौडा, दक्षिण-पश्चिम शिक्षक मतदारसंघातून के. के मंजूनाथ, दक्षिण-पश्चिम पदवीधर जागेवरून अयानूर मंजुनाथ, उत्तर-पूर्व पदवीधर जागेवरून चंद्रशेखर पाटील, बंगळुरू पदवीधर जागेवरून रामोजी गौडा आणि दक्षिण-पूर्व शिक्षक मतदारसंघातून डीटी श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR