22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

मंचर : जवळे (ता. आंबेगाव) येथे अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहप्रसंगी मिरवणूक निघाली. फेटे बांधलेले वराती लग्नासाठी सोबत होतेच. सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत करण्यात आले. लग्नघटिका समीप आली असताना वर-वधूने नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरामोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. त्याचे पालन करण्याचा निश्चय करतानाच देशाविषयीचे कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचे सांगितले. नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करून नवविवाहित जोडप्याने एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला.

जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहाची तयारी सुरू असताना नवरदेवाची स्वारीही आली. अशात स्वीप पथकाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी व-हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR