मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रोज शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे हे नेते संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. या दाव्यानुसार राज्यात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा फुटणार याच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या दाव्याची हवाच काढली. उदय सामंत यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. राज्यात राजकीय भूकंप कधी होतो? आणि कधी बाहेर पडतात याची मी वाट पाहतोय, अशा शब्दांत शरद पवार यांनी टिप्पणी केली.
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बंद खोलीत चर्चा केली, ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे तर एका प्रकल्पाबाबत केली, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. नवीन सहकार मंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयांवर बोलायचे होते, त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली, असेही शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्यातील याबाबतच बोलणं झालं. राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची त्यांची इच्छा आहे. पण याबाबत त्यांची टोकाची भूमिका नव्हती. त्यांची समजूत आम्ही काढली असल्याचे पवार यांनी सांगितले.
दावोसला पक्ष फोडायला गेले का?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असे वाटत नाही, ते डोक्यातून काढून टाका. राज्याचे उद्योग मंत्री सामंत हे दावोसला गुंतवणूक करण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला गेले होते, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.