27.5 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeराष्ट्रीयवक्फ विधेयक भविष्यात इतर समुदायासाठी पायंडा

वक्फ विधेयक भविष्यात इतर समुदायासाठी पायंडा

राहुल गांधींची टीका ख्रिश्चनांकडे वळण्यास फार वेळ लागणार नाही

नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजूर मिळाली. हे विधेयक आता राष्ट्रपतींकडे जाईल आणि त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, हे सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक बातमी पोस्ट करत आरएसएसला ख्रिश्चनांकडे जाण्यास वेळ लागणार नाही असे म्हणत वक्फ विधेयक भविष्यात इतर समुदायासाठी पायंडा असल्याचे गांधी म्हणाले.

वक्फ बिलाबद्दल मांडलेल्या भूमिकेचा उल्लेख करत राहुल गांधींनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकाने दिलेले वृत्त एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे. राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी म्हणालो होतो की, वक्फ विधेयक आता मुस्लिमांवर हल्ला करत आहे. पण, त्याचबरोबर ते भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी ते एक पायंडा पाडत आहे.

आरएसएसची नजर ख्रिश्चनांकडे जाण्यास फार वेळ लागला नाही. संविधान ही एकमेव ढाल आहे जी आपल्याला अशा हल्ल्यांपासून वाचवते. आणि त्याचे रक्षक करणे ही आपल्या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे असे भाष्य राहुल गांधींनी केले आहे.

कॅथलिक चर्चकडील जमिनींचा मुद्दा
द टेलिग्राफने आरएसएसशी संबंधित ऑर्गनायझरमधील एका लेखाचा हवाला देत वृत्त दिले आहे. ऑर्गनायझरमध्ये कॅथलिक चर्च की वक्फ बोर्ड, भारतात कुणाकडे सर्वाधिक जमीन असा लेख प्रसिद्ध झाला असून त्यात कॅथलिक चर्चेकडे असलेल्या जमिनीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. कॅथलिक चर्चकडे ७ कोटी हेक्टर जमीन असल्याचे या लेखात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR