22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयजलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली

जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली : दिल्लीतील जलसंकटावर उपोषणाला बसलेले जलमंत्री आतिशी यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा आप नेते संजय सिंह आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाच्या दाखल केले.

मंत्री आतिशी यांच्या प्रकृतीबाबत एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी सांगितले की, आतिशी यांना रुग्णालयात आणले असता त्यांच्या रक्तातील साखर कमी होती. त्याची सोडियमची पातळीही कमी होती. त्यांना इमर्जन्सी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, दरम्यान, खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, मंत्री आतिशी यांची प्रकृती बिघडल्यामुळे उपोषण स्थगित केले असून, दिल्लीच्या पाणीप्रश्नावर आता संसदेत आवाज उठवला जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR