पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली आहे. दरम्यान, त्या दिवशी गर्भवती महिलेकडे १० लाखांची डिपॉझिट मागितले होते अशी कबुली मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ. केळकर यांनी दिली आहे. आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झाले माहिती नाही, पण १० लाखांची डिपॉझिट मागितल्याचेही केळकर म्हणाले.
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीमुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचा राजीनामा लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ हा राजीनामा एक्सेप्ट करेल असे केळकर म्हणाले.
दरम्यान, मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. मी दडपणाखाली वावरत आहे. तसेच समाजमाध्यमांवर माझ्यावर कठोर टीका देखील होत आहे. यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यामध्ये कुठेही रुग्णालयाची बदनामी नको म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे घैसास यांनी सांगितल्याचे केळकर म्हणाले.
आमच्याकडे अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही
आमच्याकडे अद्याप शासकीय अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर बोलणे योग्य होईल असे डॉ. केळकर म्हणाले. डिपॉझिट फक्त त्यांच्यामध्येच होते जे पेशंट हाय व्हाल्यूम होते. तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरु शकतात त्यांच्याकडून घेते होते असेही केळकर म्हणाले. आता डिपॉझिटची प्रक्रिया बंद केली असल्याचे केळकर म्हणाले. आमच्याकडे अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही. पण त्यादिवशी राहू-केतू काय झाले माहिती नाही, पण १० लाखांची डिपॉझिट मागितल्याचे केळकर म्हणाले. पण असे कोणीही लिहीत नाही. मी दररोज १० शस्त्रक्रिया करतो. आजपर्यंत किती केल्या असतील पण मी कधीही असे डिपॉझिट मागितले नसल्याचे डॉ. केळकर म्हणाले.