33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही

 मंत्रालयाबाहेर आमदारांचा आक्रमक पवित्रा - आंदोलक आमदार ताब्यात

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे होत आहेत. अशातच मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले. आज तिस-या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांनी आंदोलन केले. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले.

मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र हा अतिशय संवेदनशील परिसर आहे तसेच जवळ वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतले. यावेळी या आमदारांनी घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केले. मंत्रालयाला या आमदारांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांनी केली. आंदोलन करणा-या या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या. आरक्षण मिळेपर्यंत माझा पक्षच नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे. तर सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे, अधिवेशन का बोलावत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR