22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही दुस-याच्या कामाचे श्रेय घेत नाही

आम्ही दुस-याच्या कामाचे श्रेय घेत नाही

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : राजधानी मुंबईतील कोस्टल रोड म्हणजे किनार मार्गच्या भूमिपूजनावरुन श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली असून कोस्टल रोड लोकार्पणाच्या सोहळ्यातही याचे पडसाद पाहायला मिळाले. बाळराजे म्हणाले की, आम्ही दुस-याच्या कामाचे श्रेय घेत नाही, आम्ही जे करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या शुभारंभप्रसंगी आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या कोस्टल रोडसाठी आपण घेतलेल्या परिश्रमाची माहिती देत, मी श्रेयवादासाठी कधीच मुंबईचा विकास थांबवला नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.

मुंबईतील बहुप्रतिक्षीत कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशा एका मार्गिकेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरुन मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे. तर, शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी मार्गिका खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे. दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यात श्रेत्रयवादी लढाई उघड झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

काल मला सोशल मीडियावर असे पाहायला मिळाले की, उबाठाचे बाळराजे यांनी सांगितले की हे सगळे आम्ही केले. आमच्या कामाचे श्रेय हे घेत आहेत. पहिल्यांदा मी त्यांना सांगतो, आम्ही दुस-याच्या कामाचं श्रेय घेत नाही, आम्ही जे करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. कोस्टल रोडची संकल्पना फार वर्षापूर्वीची असून उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या दोन निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या, कोस्टल रोड कधी झालाच नाही. सन २००४ ते २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात युपीएचे सरकार होते. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली दरबारी आपण प्रयत्न केल्याचे फडणवीसांनी अनेक उदाहरणांसह सांगितले.

मला भूमिपूजनालाही बोलावले नाही
आमच्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे हेही लोकांना कळलं पाहिजे, हे सगळे करुन मी आणले, पण ज्यावेळी याचं भूमिपूजन करायचे होते, रातोरात भूमिपूजन ठरवले. मी मुख्यमंत्री होतो, तरी मला भूमिपूजनलाही उद्धव ठाकरेंनी बोलवले नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली.

मुख्यमंत्र्यांनीही साधला निशाणा
कद्रू लोकं श्रेय देऊ शकत नाहीत, कोत्या मनोवृत्तीच्या लोकांचं ते काम नाही. ते फक्त अडथळे आणतात, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच, अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी मच्छिमारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी आयुक्त चहल यांना सांगितले, मच्छिमारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, असेही शिंदेंनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR