31.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयदहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत

दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. या हल्ल्यानंतर अनेक देशांनी पीडित कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला अन् दहशतवादाविरोधात भारताच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. अशातच आता अमेरिकेनेदेखील दहशतवादाविरोधात जाहीरपणे भारताला पाठिंबा दिला आहे.

अमेरिकन हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि ट्रम्प प्रशासन भारताच्या बाजूने असल्याची घोषणा केली. ही घोषणा भारतासाठी हिरवा कंदील आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटना मानली जात आहे. पाकिस्तान आधीच भीतीखाली आहे की, भारत आपल्यावर कधीही हल्ला करेल. अशा परिस्थितीत भारताला मिळणारा पाठिंबा वाढल्यामुळे पाकस्तानची चिंता आणखी वाढणार आहे.

भारताने दहशतवादाविरुद्ध उभे राहावे
अमेरिकन हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी पुढे म्हटले की, भारतात जे काही घडले, त्याबद्दल आमची पूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. आम्हाला आमच्या मित्रराष्ट्राच्या बाजूने उभे राहायचे आहे. मला वाटते की, भारत हा अनेक बाबतीत आमचा महत्त्वाचा भागीदार देश आहे. दोन्ही देशांमधील व्यापाराबाबतची चर्चा लवकरच यशस्वी होईल. भारताने दहशतवादाविरुद्ध उभे राहिले पाहिजे. आम्ही भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. जर धोका वाढला तर ट्रम्प प्रशासन दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला संसाधनांसह मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR