छत्रपती संभाजीनगर : लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ नववधूमध्ये आली आहे. आपल्या तळहातावरील मेंदीत आपल्या नव-याचे छायाचित्र काढून घेतले जात आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत.
विवाहाच्या विधींमध्ये मेंदीला खूप महत्त्व आहे.‘मेंदीवाले हाथ वो तेरे पायल वाले पांव… याद बहोत आते है मुझको तू और अपना गाव’ हे ‘मेंदीवाले हाथ’ या नावाच्या अल्बममधील गाणे खूप लोकप्रिय झाले होते, तसेही हिंदी व मराठी चित्रपटांत मेंदीवर अनेक गाणी लिहिली गेली व ती सुपरहिटही ठरली आहेत. भविष्यात पोर्ट्रेट मेंदीवर जर गाणे आले तर नवल वाटायला नको.
लग्नसराईत नववधू आपल्या हातावर सुंदर, सुरेख नक्षीकाम केलेली मेंदी काढतात. काळानुरूप त्या नक्षीकामात बदल होत गेले. आता नववधूंमध्ये तळहातावर आपल्या जीवनसाथीचे छायाचित्र काढण्याचा ट्रेंड आला आहे. होय. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी व त्याची आठवण आली की, तळहाताकडे पाहण्यासाठी हा नवीन ट्रेंड नववधूप्रिय ठरत आहे.
मेंदीद्वारे छायाचित्र काढले जात आहे.
पोर्ट्रेट मेंदी हा सध्या लग्नसराईतील नववधूप्रिय प्रकार आहे. आपल्या जीवनसाथीचे हुबेहूब छायाचित्र मेंदीच्या साह्याने काढले जाते. हा प्रकार पहिले टॅटूमध्ये होता. ते पोर्ट्रेट टॅटू तळहात सोडून शरीरावर कुठेही काढले जातात. पोर्ट्रेट मेंदीत कार्बनचा वापर केला जातो. फोटोची कॉपी करून हातावर काढली जाते. मेंदीने टेन्सिल होते. त्याद्वारे चेहरा काढला जातो. मेंदीचा रंग उडाला की, पोर्ट्रेटही निघून जाते. पोर्ट्रेट टॅटू शरीरावर कायमस्वरूपी राहते.
पोर्ट्रेट मेंदीसाठी किती खर्च येतो?
पोर्ट्रेट मेंदीत आर्टिस्ट जेवढा शार्प असेल तेवढी रक्कम वाढत जाते. नवीन मेंदी आर्टिस्ट ३ हजार ते ६ हजारांपर्यंत रक्कम आकारतात, तर अनुभवी शार्प आर्टिस्ट ८ हजार ते १० हजारांपेक्षा अधिक रक्कम आकारतात