28.9 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रजोडप्यांमध्ये वेडिंग रील्सची क्रेझ

जोडप्यांमध्ये वेडिंग रील्सची क्रेझ

पुणे : यंदा लग्नाच्या रेशीमगाठीत अडकणा-या जोडप्यांमध्येही रील्सची के्रझ वाढली आहे. या वर्षी वेडिंग फिल्मसह वेडिंग रील्स तयार करून घेण्याला जोडप्यांची पसंती देत असून, प्री-वेडिंग शूट करून घेण्यापेक्षा छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे वेडिंग रील्सला सर्वाधिक मागणी होत आहे. छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर्सही लग्नांमध्येच विविध गाण्यांवर रील्स शूट देत असून, ते सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सोमवारपासून (दि. २७) लग्नसराईच्या सीझनला सुरुवात झाली आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रवारीमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत आणि त्यामुळेच छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे लग्नाच्या शूटसाठी मागणी वाढली आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश येथूनही लग्नाच्या शूटची कामे छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सला मिळात आहेत.

लग्नातील क्षण रील्समध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या लग्नसराईचा सीझन सुरू झाल्यामुळे छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे लग्नाच्या शूटसाठी विचारणा सुरू होत आहे. लग्नामध्येच थोडा वेळ काढून वेगवेगळ्या थीमप्रमाणे हे रील्स शूट केले जात आहेत, त्याला विविध गाण्यांची जोड देऊन आणि एडिटिंग करून हे रील्स जोडप्यांना तयार करून दिले जात आहेत. हे रिल्स फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब चॅनेलवर अपलोड होत आहेत.

छाया चित्रकार, व्हिडीओग्रफरांना अच्छे दिन
लग्नाच्या शूटसाठी छायाचित्रकार अन् व्हिडीओग्राफरच्या फेब—ुवारीपर्यंतच्या तारख्या आतापासूनच बुक झाल्या आहेत. लग्नसराई सुरू झाल्याने लग्नाच्या शूटमध्ये छायाचित्रकार-व्हिडीओग्राफरची संपूर्ण टीम व्यग्र आहे. एका टीमकडे दहा ते बारा लग्नाच्या शूटची कामे आहेत. एका शूटसाठी ३० ते ७० हजार रुपयांपर्यंतचे मानधन ते घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR