37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअक्षय्य तृतीयेला काय खरेदी करणार?

अक्षय्य तृतीयेला काय खरेदी करणार?

मुंबई : अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. अक्षय्य तृतीया माता लक्ष्मीसाठी समर्पित दिवस आहे. अक्षय्य तृतीया हिंदु धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी आहे. यादिवशी देवी लक्ष्मीला आपल्या घरी आणण्यासाठी लोक विविध पुजा-अर्चा करतात. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी यासोबतच नवीन वाहन आणि घर खरेदी करण्यासही पसंती दिली जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या गोष्टी खरेदी केल्यास सुख-समृद्धी आणि भरभराट होते असे म्हटले जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही आपल्या उच्च राशीत स्थित असल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी, वाहन आणि घर खरेदी करणे शुभ मानले जाते. पण या दिवशी खरेदी करण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता, हे तुम्हाला माहित आहे का? याबाबत जाणून घ्या. दरम्यान, अक्षय्य तृतीयेचा दिवस हाच शुभ दिवस आहे, म्हणजेच हा संपूर्ण दिवस कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी अतिशय शुभ आहे. या शुभ काळात तुम्ही घर किंवा ऑफिससाठी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता.

झाडे खरेदी करू शकता
ज्योतिषी शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही विशेष वनस्पती आणल्याने घरात भरपूर संपत्तीची भरभराट होईल.

तुळशीचे रोप
सनातन धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पूजनीय मानलं जातं. देवी लक्ष्मी तुळशीच्या रोपामध्ये वास करते, असं म्हटलं जातं . या वनस्पतीची नियमित पूजा केल्याने व्यक्ती आर्थिक आघाडीवर समृद्ध होते. घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल.

मनी प्लांट
घरातील संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून मनी प्लांट सर्वात लोकप्रिय आहे. ही वनस्पती जितक्या वेगाने वाढेल तितक्या वेगाने घरात पैसा येतो. घरामध्ये मनी प्लांट लावताना ते आग्नेय दिशेला लावावे, हे लक्षात ठेवा. मनी प्लांट कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. त्याची पाने जमिनीवर विखुरणे अशुभ मानले जाते.

सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त
सकाळी : ०५:३३ ते १०:३७ पर्यंत
दुपारी : १२:१८ ते ०१:५९ पर्यंत
संध्याकाळ : ०४:५६ ते रात्री १०:५९ पर्यंत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR