24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रज्यांनी खाऊ घातले त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार?

ज्यांनी खाऊ घातले त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार?

मुंबई : ज्यांनी खाऊ घातले त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार? अशी घणाघाती टीका शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. माझे कुटुंब सोडून पवार घराण्यातील सर्वजण माझ्याविरोधात प्रचार करतील, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाषणाची वेळ आली की, अजित पवार बाथरुममध्ये असायचे. तुम्हाला हिंदी-इंग्रजी बोलता येत नाही, या तुमच्या कमतरता होत्या. कधी समोर येऊन सांगितल्या नाहीत. तू शरद पवारांच्या भावाचा मुलगा होता, म्हणूनच उपमुख्यमंत्री झाला. अरे काय काका का? का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, असे मी अमोल कोल्हेंना काल सांगितले होते. अजित पवार महाराष्ट्रात तुम्ही काय केले सांगा. कोणता क्रांतीकारक निर्णय घेतला सांगा. सामान्य माणसाला तुमच्यासमोर येण्याचे धैर्य नाही. सुप्रिया सुळेंकडे प्रत्येकजण येऊन सेल्फी काढतो. तुम्हाला लोक घाबरतात.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, स्वत:ची तुलना शरद पवारांशी करु नका. तुम्ही त्यांच्यापुढे सेंटीमीटरही नाहीत. आजही असे पुतणे आहेत, जे काकासमोर मान वरतीही करत नाही. पवारांच्या कुटुंबियांत विष कोणी टाकायला सांगितले तुम्हाला, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले कोणामुळे अर्थमंत्री झाले. हे सर्वांना माहिती आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर आम्हाला टोकाची भाषा वापरली जायची. भाषणे करायला अभ्यास लागतो. विरोधी बाकांवर तुम्हाला तुमचा पीए भाषणे लिहून देत होता. सत्ताधा-यांच्या टीपांवरती मांडणी करणारे अजित पवार होते.

सत्ताधारी अडचणीत येणार नाहीत, त्यांच्यासाठी हे प्रयत्न करत होते. मी एक सिडकोचे एक प्रकरण काढले होते. त्यावेळी वेगळाच विषय काढला आणि आमचा विषय मागे टाकला. तुम्ही याचे उत्तरे द्या. सरकारसाठी अजित पवारांनी पदाचा वापर केला. १९९१ मध्ये कोणामुळे निवडून आलात. दरवेळी शरद पवार तुमच्यासाठी शेवटची सभा बारामतीमध्ये घ्यायचे. प्रचंड बहुमताने निवडून आणा असे शरद पवार आव्हान करायचे. ब्लॅकमेल करायचे सोडून द्या. मराठा आंदोलनावेळी तुम्हाला लोकांनी बारामतीमध्ये येऊन देत नव्हते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR