18 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्र‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे महत्त्व घरात बसणा-यांना काय कळणार

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे महत्त्व घरात बसणा-यांना काय कळणार

परळी : जे अडीच वर्ष केवळ घरात बसले त्यांना ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम काय समजणार. या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामान्यांचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बदनामी करणा-यांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आता पर्यंत झालेल्या शासन आपल्या दरी मध्ये सगळ्यात यशस्वी हा कार्यक्रम झाला. ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आतापर्यंत वीस कार्यक्रम झाले. १ कोटी ८४ लाख लोकांनी ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा लाभ घेतला.

विरोधकांवर हल्लाबोल
सरकारचा बोगस कार्यक्रम आहे असे काहीजण म्हणतात. अनेक लोक लाभ घेऊन गेले. जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचे महत्व असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. अडीच वर्ष घरात राहून बोगसगीरी केली त्यांनी असे म्हणणे हा लोकांचा अपमान आहे. आता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठ्या प्रमाणावर लोक या कर्यक्रमाला येत आहेत. ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश जागा मिळाल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकाल बघून मोदींची लाट दिसली. लाट संपली म्हणणा-यांना सडेतोड उत्तर मिळाले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. हे शेतकरी कष्टक-यांचे सरकार त्यांना वा-यावर सोडणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR