नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेज्ािंग अॅप व्हॉट्सअॅपने ७१ लाख भारतीय युजर्सचे अकाउंट बंद केले आहेत. म्हणजेच, ते आता या मेसिज्ािंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. यातील बहुतांश खाती सायबर फ्रॉड आणि घोटाळ्यांशी संबंधित आहेत, तर काहींनी व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात उघड झाले आहे.
व्हॉट्सअॅपने आपला मासिक अहवाल जारी केला आहे. यात सांगितल्यानुसार, मेटाच्या मेसेज्ािंग अॅप व्हॉट्सअॅपने सुमारे ७१ लाख भारतीय अकाउंट बंद केले आहेत. हे अकाउंट १ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत तयार करण्यात आली आहेत. या युजर्सनी अॅपचा गैरवापर केल्याचे कंपनीने सांगितले. तसेच, इतर युजर्सनी देखील कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही बंदी घालण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपने एकूण ७१,८२,००० खाती बंद केली आहेत. ही सर्व खाती १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कंपनी अॅडव्हान्स मशीन लर्निंगचा वापर आणि डेटा अॅनालाइज करते. याद्वारे संशयास्पद अकाउंट्स ओळखले जातात. अशाप्रकारे आतापर्यंत लाखो खाती बंद करण्यात आली आहेत.