17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रघेतलेले निर्णय लागू कधी होणार?

घेतलेले निर्णय लागू कधी होणार?

शरद पवार यांचा महायुतीला सवाल

पुणे : आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. ते ज्या प्रकारे प्रशासकीय निर्णय घेत आहेत ते पाहता यांनी घेतलेले निर्णय लागू होणार आहे का? प्रशासन सध्या यांच्या कामामुळे नाराज आहे. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यावी लागेल, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

आज महाविकास आघाडीकडून महायुती सरकारविरोधात गद्दारांचा पंचनामा जाहीर करण्यात आला. आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीपूर्वी एल्गार करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या शासन निर्णयावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी ज्या वेगाने निर्णय घेण्यात आले त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हत्या प्रकरणाची अद्याप योग्य माहिती आमच्याकडे आलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल असे काही बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले. लोकसभेच्या निकाल काहींनी मान्य केला नाही, तेव्हा लोकांनी बदल हवा आहे हे सांगितले.

महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली
उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवे. मुंबई हे असं शहर आहे तिथं २ पोलिस कमिशनर आहेत. जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा. पाच कमिशनर करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी गद्दाराना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा. ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे. मोठं मोठे सध्या होर्डिंग लावतात. देवेंद्रजी म्हणतात उद्या गाडी खाली कुत्रा आल तरी म्हणाल गृहमंत्री जबाबदार आहे. आता यावर त्यांचे काय उत्तर आहे. सध्या केवळ कलाकार सोबत घेऊन मोठ्या जाहिराती सरकार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR