16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeहिंगोलीमहाराष्ट्रातील निवडणूक चिन्हाचा घोळ कधी मिटणार?

महाराष्ट्रातील निवडणूक चिन्हाचा घोळ कधी मिटणार?

हिंगोली/आय. डी. पठाण
महाराष्ट्रातील निवडणूक चिन्हाचा घोळ कधी मिटणार याबाबतीत जनतेत उलटसुलट चर्चा सुरू असून, काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर स्व. इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसला बैलजोडी ही निशाणी होती. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने बैलजोडी हे चिन्ह गोठवून काँग्रेस पक्ष व दुस-या फुटलेल्या गटाला खुल्या चिन्हामधून मागणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस पक्षाला गाय-वासरू हे चिन्ह मागणी केल्यावर मिळाले व फुटीर गटाला त्यांनी ज्या चिन्हाची मागणी केली ते चिन्ह मिळाले.

त्यानंतर सुध्दा काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यावेळी सुध्दा निवडणूक आयोगाने गाय-वासरू चिन्ह गोठवून काँग्रेस पक्षाला व फुटीर गटाला खुल्या चिन्हामधून मागणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी काँग्रेस पक्षाने ‘पंजा’ निशाणीची मागणी केली. ते चिन्ह आयोगाने काँग्रेस पक्षाला दिले व फुटीर गटाला त्यांनी ज्या चिन्हाची मागणी केली ते चिन्ह आयोगाने दिले. परंतु महाराष्ट्रात प्रथम शिवसेना फुटली, निवडणूक आयोगाने त्यांचे चिन्ह गोठवले नाही. फुटीर गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. निवडणूक आयोगाने फुटीर गटाला घड्याळ हे चिन्ह दिले. त्यानंतर उध्दव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले व शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले.

त्यामुळे शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या पक्षाने वरील चिन्हाची मागणी केली की ते निवडणूक आयोगाने दिले हे मात्र कळू शकले नाही. तसेच सत्तेच्या लालसेपोटी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्यावेळेस सुध्दा निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिले. वरील दोन्ही फुुटीर गटाला पक्षाचे मूळ चिन्ह दिले.

हिंगोली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील मतदार अशी चर्चा करताना दिसत आहेत की, पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे मूळ चिन्ह गोठवून दोन्ही गटाला खुल्या वर्गातून चिन्ह देण्याची चर्चा होत असून, निवडणूक आयोगाने वरील चिन्ह वाटपाचा निर्णय कायद्याप्रमाणे केला की, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, या म्हणीप्रमाणे घेतला अशी मागणी महाराष्ट्रातील मतदारांमध्ये ऐकायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांचा वाद कोर्टात गेला असून, कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर सत्य समोर येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR