23.3 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रमोठा भाऊ कोण? प्रकरणावरून संजय निरुपम यांनी पक्षनेत्यांना दिला घरचा आहेर

मोठा भाऊ कोण? प्रकरणावरून संजय निरुपम यांनी पक्षनेत्यांना दिला घरचा आहेर

मुंबई : १८ व्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने महायुतीचे पाणीपत केल्यानंतर महायुतीत आता मोठा-भाऊ कोण? यावर खटके उडत आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभुराज देसाई यांनी आपणच मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा आधार घेतला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ही प्रकरणात उडी घेतली असून, भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगत पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे मोठा भाऊ, छोटा भाऊ ही चर्चा चांगलीच रंगली आहे.

आज माध्यमांशी बोलताना निरुपम म्हणाले की, भाजप महायुतीत मोठा भाऊ असून, तो मोठा पक्ष आहे. आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला आहे. ठिक आहे. पण भाजप हा राज्यात आणि देशात मोठा पक्ष आहे. यासोबतच राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे सर्वात मोठे नेते आहेत, हे वास्तव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आणि पुढेही लढू, असेही निरूपम म्हणाले. दरम्यान विधानसभेत जास्त जागा मिळाव्या या साठी महायुतीत मोठा-छोटा भाऊ कोण याची चर्चा रंगली असता, महाविकास आघाडीने दोन दिवसापुर्वीच आम्ही विधानसभेत एकत्र लढू असे म्हणत आमच्या मोठा आणि छोटा भाऊ कोणी नाही, असे म्हटले आहे.

सरकारची चुक दाखवणं विरोधकाच काम-निरुपम
दरम्यान, यावेळी संजय निरुपम यांनी मातोश्रीत खोटं बोलण्याचा कारखाना असून, उद्धव ठाकरेंनी बनवलेली मातोश्री-२ ही घोटाळ्यातून बनली आहे. मातोश्रीत दररोज एक खोटा विषय तयार केला जातो आणि संजय राऊत तो विषय लोकांपुढे मांडत असतात. त्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण होत आहे, असे ही निरूपम म्हणाले. लोकांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. सरकार कुठे चुकले तर आम्हाला चूक दाखवणं हे विरोधकांच काम आहे. पण राऊतांनी विनाकारण सरकारला बदनाम करू नये, असेही संजय निरुपम म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR