33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील चौथा उमेदवार कोण?

पुण्यातील चौथा उमेदवार कोण?

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदार संघाचा समावेश असून आजवर केवळ तीन उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामध्ये पुण्यातून महायुती आणि बारामती व शिरूर मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे अन्य मतदार संघातील संभाव्य नावाबाबत तर्क वितर्क करण्यात येत आहेत.

पुणे लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ तर बारामती लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरद पवार गट सुप्रिया सुळे ,आणि शिरूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघाचा विचार करता येत्या ७ मे रोजी बारामती लोकसभा मतदार संघ आणि पुणे,मावळ ,शिरूर येथील मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यामध्ये पुणे–२० लाख ३ हजार ३१६,मावळ -२५ लाख ९ हजार ४६१,शिरूर- २४ लाख ७९ हजार ७४२ आणि बारामती लोकसभा मतदार संघात २३ लाख १५ हजार ९६८ मतदार आहेत याखेरीज चार लोकसभा मतदार संघात एकूण ८३८२ मतदान केंद्र असणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR