32.2 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeसोलापूरशेअर मार्केटच्या माध्यमातून १७ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटच्या माध्यमातून १७ लाखांची फसवणूक

सोलापूर-
शेअर मार्केटमध्ये खाते उघडून त्यामध्ये १७ लाख ८५ हजार रुपये जमा करून घेऊन शेअर्स व आयपीओचा नफा मिळवून न देणाऱ्या दोघांविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गोपाल दत्तात्रय मिठ्ठा (वय ४०, रा. कुचन नगर, बालाजी मंदीरमागे, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन अनिल शर्मा आणि आशिष शहा या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ जानेवारी २०२३ राजी अनिल शर्मा व आशिष शहा य दोघांनी मिळून फेसबुकवरून स्टॉक फ्रंटाईन-जी १३ हा शेअर मार्केट ट्रेडिंग व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यामध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक अ‍ॅड करून त्याद्वारे गोपाल मिडठ्ठा यांना अ‍ॅड केले. मिठ्ठा यांचा विश्वास संपादन करून शर्मा व शहा यांनी मिठ्ठा यांना शेअर मार्केट व्यवसाय करण्याकरीता मिडठ्ठा यांच्या मोबाईलवर एचटीटीपीस / एपीपी. सीएससी-एसईएसबी. कॉम / एमआयएनई अशी लिंक पाठविली.

मिठ्ठा यांना प्रायमरी अकौंट ओपन करण्यास सांगून मिठ्ठा यांच्याकडून शर्मा व शहा या दोघांनी वेगवेगळ्या खात्यावर १७ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम जमा करून घेतली. मिठ्ठा यांना कंपनीच्या चाटमणध्य त्यांनी केलेल्या खरेदी शेअर्स व आयपीओच्या वाढ ल्याच दाखविले. परंतु, मिठ्ठा यांना कसल्याही प्रकारचा नफा मिळून दिलेला नाही. तसेच मिडठ्ठा यांनी जमा केलेली १७ लाख ८५ हजारांची रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली. म्हणून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR