22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवराज्यात ‘डंका’ कुणाचा...?

राज्यात ‘डंका’ कुणाचा…?

कळंब : सतीश टोणगे
राज्यातील लोकसभेच्या निवडणूक संपल्या नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप व मित्रपक्षाने कंबर कसली आहे. साम-दाम दंडाचा वापर करून राज्यातील इतर पक्षातील नेत्यांना स्वत:कडे वळविण्यात भाजपला यश आले. नेते मिळाले पण मतदारांनी कोणाकडे कल दिला याचे उत्तर मतमोजणीनंतरच कळणार आहे.

‘बाप चोर’ ‘गद्दार’ ‘पक्ष फोडाफोडी’ ‘नेत्याची पळवा पळवी ’‘आरो प्रत्यारोप’ प्राधिकरांचा गैरवापर, वयोमर्यादा या व आदी मुद्यावर लोकसभेच्या निवडणुका गाजल्या व पारही पडल्या ,‘विकास’ मात्र ‘कोसो’दूर राहिला दहा वर्षात नक्कीच मोदी लाट होती पण या निवडणुकीत मनावी तेवढी सहानुभूती राहिली नाही.

मराठा आरक्षणामुळे अनेक उमेदवार पिछाडीवर गेली ही निवडणूक सर्वसामान्य हातात घेतली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस,म.न.से. अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत काँग्रेसचे नाना पटोले, अमित भैय्या देशमुख यांनी मैदान गाजवले. सत्ताधारी पक्षाला मात्र त्यांनी ‘सळो की पळो’ करून सोडले. निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यासारखे दिग्गज भाजप मय झाले, त्यांचा व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनावा असा मतदारावर परिणाम झाला नाही.

विरोधकांनी सत्याधा-यावर केलेले आरोप पटवून देता आले तर सत्ताधा-यांनी ते खोडून काढले. या निवडणुकीत राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी चांगलीच लक्ष घातले होते. त्यांनी प्रत्येक भागात सभा, बैठका घेतल्या .वयाच्या मुद्यावरून शरद पवार यांना टार्गेट केले गेले, पण ते ही राज्यात पायाला भिंगरी लावून फिरले व सहानुभूतीही मिळवली .

राज्यातील ब-याच लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणामुळे मराठा ओबीसी असा वाद उघडपणे झाला. याचा उद्रेक बीडमध्ये पाहायला मिळाला. एकंदर या निवडणुकीत प्रचार, मतदारांचे संघटन, उमेदवारांची निवड, करण्यात कोणाचा,‘डंका ’ वाजला ,आता यावर चर्चा होऊ लागली आहे. प्रचंड ऊन असतानाही उमेदवारावर मतदान करून घेण्याची सत्वपरीक्षा होती, ती ब-यापैकी सर्वांनीच पार पाडली नेमका निकाल राजकीय अभ्यासकांनाही सांगता येईना झाला आहे. सर्वच पक्षांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करून राज्यात किती ताकद आहे, हे दाखवून दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR