27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपला कर नाही तर डर कशाला?

भाजपला कर नाही तर डर कशाला?

सुषमा अंधारे भाजप समर्थकांवर भडकल्या

पुणे : कुणावरही ईडीची धाड पडली की, भाजपचे लावारिस भक्तुल्ले चेकाळून म्हणतात, कर नाही त्याला डर कसली? मग लोकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यावर आपापल्या नेत्यांना सांगा ना, घ्या बॅलेटवर निवडणुका. तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले. तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा. कर नाही त्याला डर कसली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत विरोधकांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी लावून धरली आहे. भाजपसह सत्तेतील इतर मित्रपक्ष विरोधकांचे आरोप फेटाळून लावत आहे. सोशल मीडियावरही या मुद्यावरून जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत असून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे भाजप समर्थकांवर भडकल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. तिन्ही पक्षांना मिळून ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीसह विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात मारकडवाडीतील ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केल्याने ही चर्चा आणखी वाढली आहे.

जोरदार आरोप-प्रत्यारोप
ईव्हीएमचा मुद्याभोवती चर्चेने फेर धरला असून सोशल मीडियावर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती समर्थक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महायुतीचे नेतेही महाविकास आघाडीचे आरोप फेटाळून लावत असून जमिनीवर काम करण्याचा सल्ला देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR